गरुडावर विराजमान संत तुकाराम महाराज... भक्तीचा साक्षात वैकुंठगमन सोहळा!
‘संत तुकाराम बाप्पा’चा अनोखा पर्यावरणपूरक देखावा; कल्याण पश्चिमेतील गणेश लोहार यांच्या घरात भक्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा सुंदर संगम
कल्याण पश्चिम :
गणेशोत्सव म्हटलं की भक्ती, श्रद्धा आणि विविध आकर्षक देखावे हे समीकरण ठरलेलेच. मात्र कल्याण पश्चिम खडकपाडा येथील श्री स्वामी सुमंगल सोसायटीमध्ये राहणारे गणेश लोहार यांनी यंदाच्या घरगुती गणेशोत्सवात भक्तीबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा अनोखा देखावा साकारला आहे.
यंदाच्या गणेशोत्सवासाठी ‘संत तुकाराम बाप्पा’ ही थीम साकारण्यात आली असून, या देखाव्यात संत तुकाराम महाराज गरुडावर बसून वैकुंठाला जात असल्याचे दृश्य साकारण्यात आले आहे. भगवंत आणि भक्त यांच्यातील अतूट नाते अधोरेखित करणारा हा प्रसंग भक्तीचा अद्भुत संगम दाखवतो. संत तुकाराम महाराजांच्या भक्तीने प्रसन्न होऊन प्रत्यक्ष भगवंताने आपले
Kalyan, Thane | Sep 15, 2026