कल्याणच्या सिंडिकेटमध्ये एकता मित्र मंडळाचा गणेशोत्सवात हिंदू मुस्लिम बांधवांचा भक्ती-परंपरा- ऐक्याचा अनोखा संगम!
26 वर्ष एकत्रित गणेशोत्सव साजरा
आगमनापासून विसर्जनापर्यंत हिंदू बांधवांसह मुस्लिम बांधवांकडून रितीरिवाजांनुसार बाप्पाची सेवा .....
कल्याणमध्ये गणेशोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावाने साजरा केला जातो. सार्वजनिक गणेश मंडळांकडून विविध धार्मिक आणि सामाजिक उपक्रमांचे आयोजन केले जाते. याच गणेशोत्सवात हिंदू-मुस्लिम ऐक्याचा सुंदर संदेश देणारे एक अनोखे मंडळ सिंडिकेट परिसरात पाहायला मिळते.
सिंडिकेट परिसरातील अतिष खान कंपाउंड परिसरातील एकता मित्र मंडळाकडून गेल्या 26 वर्षांपासून गणपती बाप्पाची प्रतिष्ठापना करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. यंदाही मोठ्या भक्तिभावाने बाप्पाची स्थापना करण्यात आली आहे.
विशेष म्हणजे, हा परिसर मुस्लिम बहुल असून या मंडळात मुस्लिम पदाधिकारी कार्यकर्त्यांची संख्या जवळपास 70 टक्�
Kalyan, Thane | Sep 16, 2026