पाचोरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौका पासुन आज शनिवार दि. ९ आॅगस्ट २०२५ रोजी सकाळी १० वाजता पाचोरा नगरपालिकेतर्फे हर घर तिरंगा रॅली काढण्यात आली. सदरची रॅली छत्रपती शिवाजी महाराज चौक, रेल्वे भुयारी मार्ग, राजे संभाजी महाराज चौक ते महाराणा प्रताप चौका पर्यंत काढण्यात आली. या रॅलीत मुख्याधिकारी मंगेश देवरे यांचेसह अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.