कर्जत: तीन वर्षांनंतरही ममदापूरची जलजीवन मिशन योजना अपूर्ण
Karjat, Raigad | May 26, 2026 ममदापूर ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांचा सध्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला असून, जलजीवन मिशन अंतर्गत मंजूर करण्यात आलेली 4 कोटी रुपयांची पाणी योजना गेल्या अडीच वर्षांपासून अर्धवट अवस्थेतच रखडली आहे. त्यामुळे वाढत्या नागरीकरणामुळे आधीच त्रस्त असलेल्या नागरिकांमधून प्रशासना विरोधात तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ममदापूर ग्रामपंचायत ही नेरळ विकास प्राधिकरणाच्या हद्दीत येत असल्याने परिसरात मोठ्या प्रमाणात गृहप्रकल्प उभे राहत आहेत. अनेक गृहप्रकल्प पूर्ण झाले असून, तेथे नागरिक वास्तव्यास देखील आले आहेत.