श्रीवर्धन: अत्याधुनिक बंदरामुळे श्रीवर्धनमध्ये घडणार मत्स्यक्रांती
श्रीवर्धन तालुक्यातील भरडखोल येथे उभारण्यात येणारा 167.22 कोटी निधीचा आधुनिक मत्स्यबंदर प्रकल्प हा संपूर्ण किनारपट्टीच्या आर्थिक विकासाला चालना देणारा महत्त्वाकांक्षी प्रकल्प ठरणार आहे. यामुळे तालुक्यातील हजारो मच्छीमार कुटुंबांच्या जीवनमानात मोठा बदल होण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे. महाराष्ट्र सागरी मंडळाच्या माध्यमातून विकसित होणारा हा प्रकल्प केवळ बंदरापुरता मर्यादित नसून मत्स्यव्यवसाय, पर्यटन, वाहतूक, कोल्ड स्टोरेज, बर्फ उद्योग आणि स्थानिक रोजगार यांना नवे बळ देणारा ठरणार आहे.