कुंजीरवाडीत कुंजीर लॉन्सजवळ आढळला एकाचा मृतदेह...
.
.
लोणी काळभोर, ता. ३ : पुणे–सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील कुंजीरवाडी (ता. हवेली) येथील कुंजीर लॉन्सजवळ एका ४५ वर्षीय व्यक्तीचा बुधवारी (ता.३) सायंकाळी सहा वाजण्याच्या मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. संबंधित व्यक्तीला मद्यपानाचे व्यसन असल्याने मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
संजय भगवान वडजे (वय ४५, रा. बुरुड गल्ली, नांदेड रोड, नरसी, ता. नायगाव, जि. नांदेड) असे मृत व्यक्तीचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळपासून संजय वडजे हे कुंजीर लॉन्स परिसरात मद्यधुंद अवस्थेत फिरताना काही नागरिकांना दिसून आले होते. त्यानंतर ते कुंजीर लॉन्सजवळील एका जागेत जाऊन झोपले. सायंकाळी साडेपाचच्या सुमारास स्थानिक नागरिकांनी त्यांना उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांनी कोणताही प्रतिसाद दिला नाही.
याबाबतची माहिती तात्काळ लोणी काळभोर पोलिसांना देण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच पोलीस अंमलदार मयूर बोरावके आणि महेंद्र आगळे घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तातडीने रुग्णवाहिकेच्या मदतीने वडजे यांना लोणी काळभोर येथील एका खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासणीअंती त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे घोषित केले.
प्राथमिक माहितीनुसार, अतिमद्यपानामुळे मृत्यू झाल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तथापि, मृत्यूचे नेमके कारण शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान, वडजे हे नांदेड जिल्ह्यातील रहिवासी असून ते कुंजीरवाडी परिसरात नेमके कशासाठी आले होते, याचाही शोध पोलीस घेत आहेत. त्यांच्या नातेवाईकांशी संपर्क साधण्याचे प्रयत्न सुरू असून, या घटनेचा पुढील तपास लोणी काळभोर पोलीस करीत आहेत.
.
.
.
#PuneNews #LoniKalbhor #Kunjirwadi #CrimeNews #UnfortunateIncident #DeathUpdate #BreakingNews#Kunjirwadi #LoniKalbhor #PuneNews #Nanded #Haveli #HighwayAlert #BreakingNews #MarathiNews#PuneNews #LoniKalbhor #BreakingNews #Nanded
Haveli, Pune | Jun 3, 2026