सेलू: सेलू तालुक्यात 50 शेतकरी कुटुंबांना पालकमंत्र्यांकडून दिवाळी भेटी व सेंद्रिय खत वाटप
Seloo, Wardha | Nov 10, 2026 सेलू तालुक्यात पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी 50 आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना मोफत हरित सेंद्रिय खत वाटप केलं. घरकुल लाभार्थ्यांना चाव्या व प्रमाणपत्रं दिली गेली. 53 जणांना जात प्रमाणपत्रे देण्यात आली. दिवाळी सणाची उमेद देणारा हा उपक्रम तहसील कार्यालयात नुकताच पार पडला.