जाफराबाद: कुंभारझरी येथे बिबट्याच्या हल्ल्यात शेतकऱ्याची गाय ठार ,परिसरात भीतीचे वातावरण
आज दिनांक 25 मे 2026 वार सोमवार रोजी दुपारी 3 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जाफराबाद तालुक्यातील कुंभारझरी येथे काल दिनांक 24 मे 2026 वार रविवार रोजी सायंकाळच्या सुमारास शेतकरी सिराज शहा नूर यांच्या गट नंबर 171 मधील शेतात बिबट्याने हल्ला करत गाय ठार केली आहे, ही घटना संपूर्ण गाव परिसरात माहिती होताच परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून याची माहिती वनविभागाला देण्यात आली आहे ,वन विभागाने वेळीच या शेतकऱ्याला योग्य ती आर्थिक मदत द्यावी अशी मागणी सुद्धा होत आहे.