हिंगणा: वानाडोंगरी येथील नायब तहसीलदाराची गळफास लावून आत्महत्या
Hingna, Nagpur | May 4, 2026 वानाडोंगरी येथील ग्रीनफिल्ड सोसायटीत राहणारे नायब तहसीलदार वैभव रामेश्वर राठोड (वय ४२) यांनी घरीच गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना उघडकीस आली. ते मौदा तालुक्यात नायब तहसीलदारपदावर कार्यरत होते. सुटी असल्याने ते घरी होते. एक मुलगा, एक मुलगी आणि पत्नीसह राहत होते. त्यांच्या मेव्हण्याकडे विवाहसोहळा असल्याने पत्नी दोन मुलांसह बाहेरगावी गेली होती. त्यामुळे ते फ्लॅटमध्ये एकटेच होते. आज सायंकाळी त्यांच्याकडे कळमनुरी (हिंगोली) येथील त्यांची बहीण आली.