अमरावती: 'स्पार रेंट शॉप'फसवणूकप्रकरणी पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार, राजापेठ पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल
स्पार रेंट शॉप मध्ये गुंतवणूक करून अधिक परतावा देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्याप्रकरणी चार जणांवर गुन्हा राजापेठ पोलीस स्टेशनमध्ये नोंदविण्यात आला होता.या संदर्भात सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर चौकशी अंति स्पार शॉप च्या नावावर अनेकांची फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर या प्रकरणी आता ही तक्रार आर्थिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आली आहे.त्यामुळे पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार आहे,अशी माहिती ५ डिसेंबर रोजी रात्री नऊ वाजता प्राप्त झाली.