जळगाव: 'के.पी. प्राईड' हॉटेलच्या मालकास हॉटेलमध्येच चौघांकडून मारहाण; शहर पोलीसात गुन्हा दाखल
जळगाव शहरातील रेल्वे स्थानकाजवळील हॉटेल के.पी.प्राईड येथील मालकास खरेदी विक्रीस झालेल्या विलंबाच्या कारणावरून चार जणांनी शिवीगाळ करत बेल्ट आणि लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करून दुखापत केल्याची घटना बुधवारी २६ नोव्हेंबर रोजी रात्री ११ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी गुरूवारी २७ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.