पोलादपूर: चिंताजनक कोकणातील धरणे तळ गाठू लागली
गेल्या वर्षी मौसमी पावसाने दमदार हजेरी लावली. सुमारे पाच-सहा महिने सलग पाऊस झाला. नोव्हेंबरपर्यंत पडलेल्या पावसामुळे पाणीसाठ्यांना बळकटी मिळाली होती. अधिक पाऊस पडल्याने पाणी टंचाईच्या झळा कमी होतील, असे सांगितले जात होते. मात्र उन्हाळा सुरु होताच कोकणात पाणीटंचाईच्या झळांनी नागरिकांना कासाविस केले आहे. कोकणातील पालघर, ठाणे, रायगड आणि सिंधुदुर्गमध्ये एकूण 173 धरणांमध्ये मे अखेरपर्यंत फक्त 33.99 टक्के उपयुक्त पाणीसाठा शिल्लक आहे.