कर्जत: लांबपल्ल्याच्या रेल्वे गाड्या थांबवा, अन्यथा रेल रोको
Karjat, Raigad | Apr 6, 2026 कर्जत रेल्वे स्थानकात कोरोना पूर्वीच्या लांब पल्ल्याच्या गाड्या पुन्हा थांबविल्या जाव्यात, सनदशीर मार्गाने आंदोलन करून ही समस्या सुटणार नसेल तर रेल रोको आंदोलन करावे लागेल, असा इशारा कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समितीच्या वतीने देण्यात आला. रेल्वे प्रवाशांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आणि त्या सोडविण्यासाठी कर्जतच्या श्री शनि मंदिराच्या रविकिरण सभागृहात कर्जत रेल्वे पॅसेंजर हक्क समितीने विशेष बैठकीचे आयोजन केले होते.