पाचोरा तालुक्यातील कुरंगी येथे आज मंगळवार दि. ५ आॅगस्ट २०२५ रोजी पहाटे ४ वाजेच्या सुमारास गोकुळ शांताराम पाटील (वय - ४३ वर्ष) रा. कुरंगी ता. पाचोरा या शेतकऱ्याचा सर्पदंशाने दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गोकुळ पाटील यांना तात्काळ पाचोरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकारी यांनी गोकुळ पाटील यांना मृत घोषित केले.