बसमत: वसमत एसटी आगारात ५ नवीन जिजाऊ बस सेवा सुरु, आधुनिक सुविधा उपलब्ध
वसमत एसटी आगारासाठी मंजूर १० नवीन जिजाऊ बसपैकी ५ बस सेवा सुरु झाल्या आहेत. या बसमध्ये सीसीटीव्ही कॅमेरा व मोबाईल चार्जिंग पॉईंटसह आधुनिक सुविधा आहेत. उर्वरित बस लवकरच येणार असून महिला, विद्यार्थी आणि ज्येष्ठ नागरिकांना फायदा होणार आहे.