जाफराबाद: छत्रपती शिवाजी महाराज चौकात अवजड वाहनांमुळे वाहतुकीस खोळंबा बायपास असण्याची शहरवासी यांची मागणी
आज दिनांक 19 एप्रिल 2026 वार रविवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये एक भले मोठे ट्रेलर मालवाहतूक करताना पाहायला मिळाले आहे यामध्ये या ट्रेलर वर असलेल्या अवजड वाहनामुळे काही काळ शहरातील वाहतुकीस खोळंबा निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहे, तसेच या अवजड वाहनांमुळे अपघात सुद्धा होतात त्यामुळे शहरातून जालना भोकरदन हा बायपास मार्ग असावा अशी मागणी सध्या शहरवासीय करीत आहे.