सेलू: शितलदास सभागृहात जागतिक दिव्यांग दिन साजरा; दिव्यांग बांधवांची करण्यात आली आरोग्य तपासणी
Seloo, Wardha | Dec 3, 2024 प्रहार दिव्यांग क्रांती संघटनेच्या वतीने सेलूतील शितलदास सभागृहात ता. 3 डिसेंबर मंगळवरला दुपारी 1 वाजता जागतीक दिव्यांग दिन साजरा करण्यात आला. या निमित्त दिव्यांग बंधावसाठी आरोग्य शिबीर घेऊन आरोग्याची तपासणी करण्यात आली. तसेच तालुक्यातील दिव्यांग शेतकरी बांधवांना कृषी साहित्याचे वाटप करण्यात आले. यावेळी तहसीलदार मलिक विराणी, नगराध्यक्षा स्नेहल देवतारे, गटविकास अधिकारी पाणबुडे, मुख्याधिकारी कळंबे, तालुका कृषी अधिकारी रविंद्र राऊत आदींची उपस्थिती होती.