सेलू: अज्ञात चोरट्यांनी केळझर येथे 2 दुकाने फोडली, 8 हजार रोख रक्कम व 3 मोबाईल चोरट्यांनी लांबविले
Seloo, Wardha | Nov 29, 2024 अज्ञात चोरट्यानी दोन दुकाने फोडली. रोख रक्कम 8 हजार, 3 मोबाईल आणि हेड फोन अज्ञात चोरट्यांनी चोरून नेले. ही घटना ता. 28 गुरुवारी सकाळी 8 वाजता दुकान उघडल्यानंतर केळझर येथे उघडीस आली. याप्रकरणी तक्रारीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा नोंद केला असल्याचे सेलू पोलिसांकडून सांगण्यात आले.