सेलू: टाकळी (किटे) येथे भरधाव ऑटो अनियंत्रित होऊन पलटी, 8 जण गंभीर जखमी
Seloo, Wardha | Dec 1, 2024 भरधाव ऑटो रोडवरील खड्डा न दिसल्याने अनियंत्रित होऊन पलटी झाला. त्यात ऑटोतील आठ जण गंभीर जखमी झालेय. ही घटना ता. 1 डिसेंबर रविवारी रात्री 7. 30 वाजताच्या दरम्यान तालुक्यातील टाकळी किटे येथे घडली. आठही जखमींना सेवाग्राम रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून तिथे त्यांचेवर उपचार सुरू आहे.