सेलू: वघाळा शिवारात शेतातील उभ्या कपाशीचे पिकातून बैलबंडी नेत पिकाचे केले नुकसान, सेलू पोलिसांत तक्रार दाखल
Seloo, Wardha | Dec 2, 2024 शेतात उभ्या असलेल्या कपाशीचे पिकातून बैलबंडी नेत पिकाचे नुकसान केल्याची घटना ता. 2 डिसेंबर सोमवारी सकाळी 10.30 वाजता मौजा वघाळा शेत शिवारात घडली. याप्रकरणी प्रशांत सुधाकर पवार वय 50 रा. वघाळा यांनी विशाल लीलाधर तुराळे याचे विरुद्ध दुपारी 2 वाजता पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. अशी माहिती सेलू पोलिसांकडून मिळाली.