सेलू: सिंदी शिवारात दुचाकीने विदेशी दारूची अवैध वाहतूक करणाऱ्यास पोलिसांनी केली अटक; एक लाख सात हजारांचा मुद्देमाल जप्त
Seloo, Wardha | Nov 29, 2024 दुचाकीने अवैधरित्या विदेशी दारूची वाहतूक करणाऱ्यास नाकाबंदी करून सिंदी पोलिसांनी एकास अटक केली. ही कारवाई ता. 28 गुरुवारी सायंकाळी 5.30 वाजताच्या सुमारास करण्यात आली. अनुप संजय सपारिया वय 26 वर्ष राहणार कंजर मोहल्ला इतवारा वर्धा असे अटक केलेल्या आरोपीचे नाव असून त्याचे ताब्यातून विदेशी दारू व दुचाकी वाहनासह 1 लाख 7 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. अशी माहिती ता. 29 ला सिंदी पोलिसांनी दिली.