सेलू: वर्धा-नागपूर रोडवर ट्रॅक्टर कंपनी जवळ अनियंत्रित दुचाकी रोडवर पडून दुचाकी चालक गंभीर जखमी
Seloo, Wardha | Dec 1, 2024 वेगाने येत असलेली दुचाकी अनियंत्रित झाल्याने रोडवर आदळून दुचाकी चालक गंभीर जखमी झाला. ही घटना ता.01 डिसेंबर रविवारला रात्री साडेआठ वाजताच्या दरम्यान सेलू नजीक वर्धा नागपूर महामार्गावर ट्रॅक्टर कंपनी जवळ घडली. गजानन डंबारे वय 50 रा. सेवाग्राम असे जखमी झालेल्या इसमाचे नाव सांगण्यात आले.