समुद्रपूर: उंदिरगाव येथे गावाबाहेर असलेल्या गोठ्यात शिरूर वाघाने पाडला वासराचा फडशा
समुद्रपुर तालुक्यातील उंदिरगाव येथे गावाबाहेर गोठ्यात बांधून असलेल्या वासराला वाघाने गोठ्यात शिरूर फरफरळत नेऊन ठार केल्याची घटना १० जुलै रोजी सायंकाळी ७ वाजताच्या सुमारास उघडकीस आली मिळालेल्या माहितीनुसार शेतकरी माणिक ढोरवाघ यांचा गावाबाहेर जनवराचा गोठा आहे.त्यात त्यांचे बैल गाय व गोरा बांधून होता रात्रीच्या सुमारास वाघाने गोठ्यात शिरूर वासराला गोठ्याबाहेर ओढत झुडपात नेऊन ठार केले यासंबंधी वनविभागाला माहिती देण्यात आली असून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा केला.