समुद्रपूर: माझी लाडकी बहीण योजनेत सहभागी न होण्याचे तालुक्यातील सेतू केंद्र चालकांनी तहसीलदारांना दिले निवेदन
मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना हि १ जुलै पासुन सुरवात झाली असुन वय वर्ष २१ ते ६५ वयोगटातील पात्र महिलांना १५०० रुपये महिन्याला मिळणार आहे.सदर योजना हि ऑनलाईन मोबाईल ॲपच्या माध्यमातून नोंदणी करून अर्ज पुर्ण करावयाचे आहे परंतु राज्याचे उपमुख्यमंत्री फडणविस केलेले विधान कि जर कुण्या सेतु धारकांनी पैश्याची मागणी केली व तशी तक्रार आम्हाला प्राप्त झाली तर सरळ आम्ही सेतु केंद्राचालाकाचा केंद्राचा परवाना रद्द करू व वेळ प्रसंगी कठोर कायदेशीर कार्यवाही सुद्धा करू असे सांगितले आहे.