समुद्रपूर: मोहगांव येथे घरात दहशत निर्माण करणाऱ्या साप सर्पमित्राने जेरबंद करुन सुखरूप सोडले जंगलात
समुद्रपुर तालुक्यातील मोहगांव येथिल गोविंदराव रंदये यांच्या घरात शनिवारी रात्री १० वाजताच्या सुमारास भल्या मोठ्या साप आढळून आला यावेळी या सापाने घरात चांगलीच दहशत निर्माण केली होती याची माहिती सर्पमित्र अमित शेळके यांना देताच त्यांनी तात्काळ घर गाठून एक तासाच्या अथक परिश्रमाने मोठ्या शिताफीने सापाला जेरबंद करताच रंदये कुटुंबियांनी सुटकेचा निःश्वास सोडला सर्पमित्र अमित शेळके यांनी रविवारी सकाळी ९ वाजता या सापाला सुखरूप मोहगांव जगलात सोडून जिवदान दिले.