इंडिगोचं विमान रद्द होताच महिला संतापली! लगेज बेल्टवर चढून ग्राउंड स्टाफशी वाद; VIDEO VIRAL
भुवनेश्वर विमानतळावर इंडिगोचे विमान रद्द झाल्यानंतर एका महिला प्रवाशाचा संताप अनावर झाल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ✈️
व्हिडिओतील दाव्यानुसार, उड्डाणात व्यत्यय आल्याने नाराज झालेली महिला इंडिगोच्या ग्राउंड स्टाफशी वाद घालताना दिसते. यादरम्यान ती लगेज कन्व्हेयर बेल्टवर चढल्याचे, तसेच कर्मचाऱ्याच्या डेस्कवरील कागदपत्रे फेकल्याचेही व्हिडिओमध्ये दिसत आहे.
इतर प्रवासी आणि कर्मचारी तिला शांत करण्याचा प्रयत्न करताना दिसले. एका प्रवाशाने “इनका बच्चा बिमार है” असे म्हटल्याचेही ऐकू येते. अखेर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी CISF जवानांना हस्तक्षेप करावा लागला.
मात्र, उड्डाण रद्द झाल्याची माहिती वेळेवर देण्यात आली नाही आणि पुरेशी मदत मिळाली नसल्याची तक्रार काही प्रवाशांनी कथितरित्या केली आहे.
📌 व्हायरल व्हिडिओवर सोशल
Pune City, Pune | Aug 14, 2026