हिंगणघाट: शेतकऱ्याना विषबाधा रोखण्यासाठी विक्रेत्यांनी उपाययोजना करावी- उपविभागीय कृषी अधिकारी तोरणे
जिल्ह्यातील शेतकरी विविध कीटकनाशकांचा वापर करतात आणि यामुळे अनेक वेळा अपघाती विषबाधा व आरोग्यावर दुष्परिणाम जाणवतात. याच पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना सुरक्षित फवारणी, विषबाधेची लक्षणं, उपाय योजना आणि शेतकरयाना करावयाचे प्रबोधन याविषयी शेती उपयोगी औषधे व खते विक्रीते यांचे उपविभागीयस्तरीय प्रशिक्षणाचे आयोजिन हिंगणघाट शहरातील वृंदावन कृषी फार्महाऊस येथे कार्यशाळा कृषी आयुक्तालय, कृषी विभाग वर्धा, क्रॉप लाईफ इंडिया व शिवार फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आली होती.