हिंगणघाट: नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रिमडोह परिसरात गांजाची विक्रीसाठी वाहतुक करणारा स्थानिक गुन्हे शाखेच्या जाळ्यात
हिंगणघाट शहरातील नागपूर हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर रीमडोह परीसरात वर्धा येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सापडा रचून गांजा अंमली पदार्थाची वाहतुक करणाऱ्या ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून १.२२२ किलोग्रॅम गांजासह मोपेड क्रमांक एम.एच.३२ ए.व्ही. ७८७६ असा एकुण १ लाख ३९ हजार ४४० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करीत आरोपी विरोध गुन्हा दाखल केला हि कारवाई जिल्हा पोलीस अधिक्षक अनुराग जैन, अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात केली