शहादा: सुलवाडे गावाजवळ दुचाकीच्या धडकेत एक जण ठार, दुसऱ्या दुचाकी चालकाविरुद्ध पोलिसात गुन्हा दाखल
शहादा तालुक्यातील सुलवाडे गावाजवळ कुरंगी सुलतानपूर गावाकडून कलमाडी गावाकडे जाणाऱ्या दुचाकी चालकाला दुचाकी क्रमांक जीजे ५ एल एन १५४६ वरील चालक हिमांशू काशिनाथ पाटील हा म्हसावद येथून सुलवाडे गावाकडे जात असताना सुलवाडे गावाजवळ भरधाव वेगात मोटरसायकल चालून समोरून येणाऱ्या दुचाकी क्रमांक एम एच ३९ इ ०७६९ वरील चालक सागर मंगल नवरत वय 26 राहणार कलमाडी तालुका शहादा याला जबर धडक दिल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात हिमांशु पाटील याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.