श्रीवर्धन: श्रीवर्धनमध्ये जलसंकटाचे सावट ! चार दिवसाआड पाणी
श्रीवर्धन शहराला पिण्याच्या पाण्याचा प्रमुख स्रोत असलेल्या रानवली धरणातील जलसाठा अत्यंत खालावल्याने शहरावर गंभीर पाणीटंचाईचे संकट ओढवले आहे. उन्हाळ्याच्या अखेरीस धरण जवळपास कोरडे पडल्याचे चित्र समोर येत असून, शहरातील अनेक भागांत नागरिकांना चार दिवसाआड पाणीपुरवठ्यावर अवलंबून राहावे लागत आहे. वाढते तापमान, घटता जलसाठा आणि अपुऱ्या नियोजनामुळे नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे.