सेलू: विकास चौकात एकास बेसबॉलच्या दांड्याने मारून केले जखमी, सेलू पोलिसांत दोघांवर गुन्हा नोंद
Seloo, Wardha | Oct 30, 2024 पैशाच्या देवाण घेवाणीवरून दोघांनी एकास बेसबॉलच्या दांड्याने मारून जखमी केले. ही घटना ता. 29 मंगळवारी सकाळी 8.30 वाजताचे दरम्यान शहरातील विकास चौकात हनुमान मंदिराजवळ घडली. सुनील उर्फ भाऊराव तुकाराम देवतारे रा. वॉर्ड क्रमांक 4 सेलू असे जखमीचे नाव आहे, तर सनी संजय खोडे व बॉबी संजय खोडे दोघेही रा. वॉर्ड क्रमांक 5 सेलू असे मारहाण करणाऱ्यांची नावे आहेत. याप्रकरणी तक्रारीवरून सकाळी 11 वाजता सेलू पोलिसांत गुन्हा करण्यात आला आहे.