जाफराबाद: पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा,टेंभुर्णी पोलीस ठाणे येथे पत्रकार बांधवांचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
आज दिनांक 8 जून 2026 वार सोमवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास जाफराबाद ता. टेंभुर्णी येथे पोलीस ठाणे पोलीस निरीक्षक यांना टेंभुर्णी परिसरातील व टेंभुर्णी गावातील पत्रकार बांधवांनी एकत्र येत निवेदन दिले आहे,की नुकतेच काही दिवसापूर्वी पत्रकार संतोष भुतेकर ,राहुल मुळे यांना काही आरोपींनी मारहाण केली आहे, त्यांच्यावर कठोर कारवाई करावी जेणेकरून पुन्हा अशी कृत्य कोणी करणार नाही,अशा मागण्यांच निवेदन आज पोलीस निरीक्षकांना पत्रकार बांधवांनी दिले आहे.