शहादा: सावखेडा गावाच्या पुलाजवळ भरधाव आयशर वाहनाची दुचाकीला धडक, 2 जण जखमी
शहादा तालुक्यातील सावखेडा गावाच्या फरशी पुलाजवळ आयशर वाहनाने दुचाकीला धडक दिल्याने दोघे जखमी झाल्याची घटना घडली. शहादा तालुक्यातील वडगाव येथील पंकेश रविंद्र पावरा व जिवन जितेंद्र पावरा हे दुचाकीने (क्र.एम.पी. ४६ एमडी ३९५४) सावखेडा गावाकडे जात होते. यावेळी एका आयशरवरील वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करुन भरधाव वेगात चालवून फरशी पुलाजवळ दुचाकीला समोरुन धडक दिल्याने अपघात घडला. घडलेल्या अपघातात पंकेश पावरा व जिवन पावरा यांना दुखापत झाली.