शहादा: म्युनिसिपल शाळेची जीर्ण झालेली इमारत दुरुस्ती करण्याची नगरपालिका प्रशासनाकडे निवेदनाद्वारे नागरिकांची मागणी
शहादा शहरातील म्युनिसिपल हायस्कूलची इमारत जीर्ण झाली असून यामुळे धोकेदायक बनली आहे त्यामुळे नगरपालिका प्रशासनाने इमारतीची नव्याने दुरुस्ती करावी, अशी मागणी शहादा येथील सामाजिक कार्यकर्ते जितेंद्र जमदाडे त्यांच्यासह नागरिकांनी केली आहे. याबाबत शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी दिनेश सिनारे यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनात म्हटले आहे की सदर म्युनिसिपल शाळेची तात्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी करण्यात आली आहे.