शहादा: दरा फाट्याजवळ सवतेने मुलाची डाळ फेकून दिल्याचे विचारणा केल्याचा राग येऊन महिलेच्या डोक्यावर दगडाने मारहाण
शहादा तालुक्यातील दरा गावाच्या फाट्याजवळ सवतेने पिशवीमध्ये ठेवलेली डाळ फेकून दिली असे विचारले असता याचा राग येऊन तिने डोक्यावर दगड मारून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी म्हसावद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.याबाबत पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दरा फाट्याजवळ नर्मदाबाई दिलीप ठाकरे यांच्या मुलाची डाळ विजुबाई दिलीप ठाकरे या सवत असलेल्या महिलेने फेकून दिली याची विचारणा केली असता नर्मदाबाई ठाकरे यांना दगड मारून जखमी केले.