शहादा: चोर समजून चाळीसगाव येथील एकाला म्हसावद येथे मारहाण , पोलिसात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
चाळीसगाव येथील एकाला चोर समजून तालुक्यातील म्हसावद येथे मारहाण झाल्याची घटना घडली. या प्रकरणी तीन जणांविरुद्ध पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.चाळीसगाव तालुक्यातील सायगाव येथील रहिवासी विशाल निंबा जगताप हे होळी उत्सवासाठी म्हसावदला आले होते.त्यावेळी चोर समजून मोहन भावसिंग भोसले व अन्य दोन जणांसह तिघांनी मिळून विशाल जगताप यांना प्लास्टिकच्या पाइपसह हातातील उलथन्याने मारहाण करून जखमी केले.