शहादा: नंदुरबार जिल्ह्यात पाणी टंचाईग्रस्त गावांमध्ये प्रशासनाकडून उपाययोजना, मंत्री अनिल पाटील यांची माहिती
नंदुरबार जिल्ह्यात काही गावांमध्ये तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. त्या पार्श्वभुमीवर जिल्ह्यात व राज्यात पाण्यासाठी विविध उपाययोजना प्रशासनाकडून केल्या जात असल्याची माहिती मंत्री अनिल भाईदास पाटील यांनी नंदुरबार येथे प्रसार माध्यमांशी बोलतांना दि.३१ मार्च रोजी दिली आहे.