शहादा: देवपाटनाल्याजवळ 58 लाख 32 हजारांचा सुगंधित गुटखा व वाहन शहादा पोलिसांनी केले जप्त, पोलिसात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल
अहमदाबाद येथून कर्नाटक राज्यात टेम्पोमधून सुगंधित सुपारी व तंबाखूजन्य पदार्थ साठ्याची वाहतुक केली जात होती. शहादा पोलिसांनी सदर टेम्पो पकडून ५८ लाख ३२ हजार रुपयांचा गुटखासह सुमारे ६५ लाख ३२ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची कारवाई तळोदा प्रकाशा रस्त्यावरील देवपाटनाला जवळ सकाळी नऊ वयाच्या सुमारास केली आहे याप्रकरणी शहादा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे आहे. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या नाकाबंदीमुळे सदर गुटखासाठा वाहतुक होतांना मिळून आला.