पोलादपूर: एसटी बस नियोजित वेळेत न आल्याने ज्येष्ठ प्रवाशांची फरफट
डोंगरी येथून मुंबईकडे जाणारी एसटी बस नियोजित वेळेत न आल्याने चार अनारक्षित प्रवासी आणि एक आरक्षणधारक ८७ वर्षीय एक ज्येष्ठ नागरिक यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. बसची बराच वेळ प्रतीक्षा करूनही ती न आल्याने प्रवाशांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. विशेष म्हणजे बस का आली नाही किंवा पर्यायी व्यवस्था काय आहे, याबाबत एसटी प्रशासनाकडून कोणतीही माहिती देण्यात आली नसल्याने प्रवाशांनी संताप व्यक्त केला.