अंबड: अंबड तहसीलदार विजय चव्हाण यांच्यावर हल्ला करणाऱ्या वाळू माफियास गोंदी पोलिसांनी घेतले ताब्यात मात्र मुख्य आरोपी फरार
Ambad, Jalna | May 16, 2025 अंबड तालुक्याचे तहसिलदार विजय लक्ष्मण चव्हाण यांच्यावर वाळूचोरीप्रकरणी कारवाईदरम्यान हल्ला करणाऱ्या आरोपींपैकी दोन जणांना गोंदी पोलिसांनी बीड जिल्ह्यातून अटक केली असून, एक विधी संघर्षग्रस्त बालक ताब्यात घेण्यात आले आहे. मात्र, प्रमुख आरोपी अद्यापही फरार आहे आणि त्याचा शोध चार पथकांमार्फत घेतला जात आहे. दिनांक ११ मे रोजी तहसिलदार चव्हाण यांनी गोंदी पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या पथकासह गोदावरी नदीपात्रात वाळूचोरीवर कारवाई करण्यासाठी गेले असता, तेथे जमलेल्या काही व्यक