पोलादपूर: काम पूर्ण झाल्याशिवाय टोल नको, हेच शासनाचे धोरणः भरत गोगावले
मुंबई-गोवा महामार्गाचे काम 14-15 वर्षांपासून रखडले आहे. अद्याप महामार्ग पूर्ण झालेला नसताना खारपाडा येथे टोल वसुली सुरू केल्याने कोकणवासीय संतप्त झाले आहेत. यावर राज्याचे रोजगार हमी, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरतशेठ गोगावले यांनी स्पष्ट भूमिका मांडली. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, रस्त्याचे काम 100% पूर्ण झाल्याशिवाय टोल आकारणी करू नये, हे शासनाचे धोरण आहे. असे असताना खारपाडा टोलनाका सुरू झाला असेल तर त्याची माहिती घेऊन योग्य ती कार्यवाही केली जाईल.