उत्तर नागपूरच्या आशीनगर भागातील किदवई हायस्कूलमध्ये एका शिक्षकावर चाकूने हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. सगीर अहमद असे जखमी शिक्षकाचे नाव असून, त्यांनी शाळेचे मुख्याध्यापक मजीब पठाण आणि मुतज्जिम खान यांच्यावर हा हल्ला केल्याचा आरोप केला आह. जखमी शिक्षकाच्या दाव्यानुसार, मुख्याध्यापक त्यांच्याकडून दरमहा ३० हजार रुपयांची मागणी करत होते. अल्पसंख्याक शाळांच्या चौकशीचे आदेश आल्यानंतर सगीर अहमद यांनी ही रक्कम देणे बंद केले होते,