पेण: पेण-पनवेल लोकलची प्रतीक्षाच
Pen, Raigad | May 23, 2026 पेण ग्रोथ सेंटर' प्रकल्पामुळे पेण, रसायनी, नागोठणे परिसरात औद्योगिक आणि व्यावसायिक विकासाचा नवा अध्याय सुरू होणार असल्याचे चित्र आहे. पेण आणि आसपासचा परिसर गेल्या काही वर्षांत वेगाने विकसित होत आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे विस्तारीकरण, औद्योगिक वाढ, जेएनपीटीचा विस्तार, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचा प्रभाव, तसेच अलिबाग-रायगड पर्यटनामुळे पेणचे महत्त्व वाढले आहे. या पार्श्वभूमीवर पेणपर्यंत लोकल ट्रेन सेवा सुरू करण्याची मागणी जोर धरत आहे.