वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी 18 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजता दिलेल्या माहितीनुसार अजनी पोलीस ठाण्याच्या पथकाने घरफोडीच्या गुन्ह्यात तत्परतेने कारवाई करत एका सराईत गुन्हेगाराला अटक केली आहे. पियुष उर्फ भांजा उर्फ राजेश शाहू असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव असून, त्याच्याकडून चोरीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.याबद्दलची अधिक माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक नितीनचंद्र राजकुमार यांनी दिली आहे.