नागपूर शहर: दवाखान्यातून गर्भनिरोधक, उत्तेजक औषधांची विक्री;आरोपी ताब्यात
14 ऑगस्ट ला सकाळी 10 वाजता मिळालेल्या माहितीनुसार विनोबा भावेनगर येथील 'श्री साई' दवाखान्यात गर्भपाताची आणि उत्तेजक औषधांची अवैधपणे विक्री होत असल्याचा प्रकार उघडकीस आला.अन्न व औषध प्रशासन आणि यशोधानगर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत डॉक्टरसह चौघांवर गुन्हा दाखल केला असून आरोपीना अटक केली आहे. या प्रकरणात मोठे रॅकेट असण्याच्या शक्यतेने पोलीस अधिक तपास करत आहेत.