पालघरमध्ये पुन्हा भूकंपाचे हादरे! जव्हारमध्ये सलग दोन धक्के; नागरिकांमध्ये भीती
पालघर जिल्ह्यातील जव्हार तालुक्यात सोमवारी रात्री भूकंपाचे सलग दोन सौम्य धक्के जाणवले. 🌍🚨
रात्री १०.०४ वाजता पहिला, तर सुमारे ५६ मिनिटांनी ११ वाजता दुसरा धक्का जाणवला. दोन्ही धक्क्यांची तीव्रता ३.४ रिश्टर स्केल इतकी नोंदवण्यात आल्याची माहिती आहे.
भूकंपाचे केंद्र जव्हार तालुक्यात जमिनीपासून सुमारे ५ किलोमीटर खोलीवर असल्याचे सांगण्यात येत आहे. सलग दोन धक्क्यांमुळे जव्हार आणि परिसरातील नागरिकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. खबरदारी म्हणून काही नागरिक घराबाहेरही पडले.
सुदैवाने या भूकंपामुळे कोणतीही जीवितहानी किंवा मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. प्रशासन आणि आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
⚠️ नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे आणि अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
#Palghar #Jawhar #Earthquake #EarthquakeNews #PalgharNews #MaharashtraNews #EarthquakeAlert #BreakingNews #LatestNews #Maharashtra #DisasterManagement #TimesOfMaharashtra
Pune City, Pune | Aug 12, 2026