धुळे: मनोहर टॉकीज जवळ छत्रपती शिवाजी स्मारकाजवळ महाविकास आघाडीच्या वतीने राज्य सरकारचा करण्यात आला निषेध.
Dhule, Dhule | Sep 2, 2024 सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण मधील राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा उभारण्यात आला. डिसेंबर 2023 ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण झालं पण उद्घाटनानंतर केवळ आठच महिन्यात हा पुतळा कोसळला. त्यानंतर महाराष्ट्रभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर आल्या. आज महाविकास आघाडीच्या सर्वच पक्षांनी एकत्र येत धुळे शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ एकत्र येत जोरदार आंदोलन करत राज्य सरकारचा निषेध केला.