धुळे: अनेर आणि हतनूर धरणांचे दरवाजे उघडले, धुळे जिल्हा प्रशासनातर्फे नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा
Dhule, Dhule | Sep 2, 2024 अनेर मध्यम प्रकल्पाच्या क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणातील पाणी साठे वाढल्याने, धरणाचे 10 दरवाजे 1 मीटर उघडण्यात आले आहेत. यामुळे सध्या धरणातून प्रति सेकंद 15 हजार 880 क्यूसेक्स पाणी विसर्ग होत आहे. तसेच तापी नदीत देखील हतनूर धरणातील 18 दरवाजे पूर्णपणे उघडण्यात आले आहेत, ज्यामुळे धरणातून 98 हजार 670 क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग तापी नदीकाठावर सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर धुळे जिल्हा प्रशासनातर्फे सतर्कतेच्या इशारा देण्यात आला आहे.