कर्जत: वंजारपाडा येथे एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला
Karjat, Raigad | Apr 27, 2026 नेरळ पोलीस ठाणे हद्दीतील वंजारपाडा गावातील एकावर तलवारीने जीवघेणा हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या हल्ल्यात सदर व्यक्ती गंभीर जखमी झाला आहे. या हल्ल्यातील आरोपी विरोधात नेरळ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तर न्यायालयानी सदर आरोपीला 4 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.