*जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती उपक्रमांचे आयोजन*
41 views | Sindhudurg, Maharashtra | Aug 4, 2026 *जागतिक स्तनपान सप्ताहानिमित्त जनजागृती उपक्रमांचे आयोजन* सिंधुदुर्ग, दि. ४ ऑगस्ट २०२६ : सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन व आरोग्य विभाग जिल्हा परिषद सिंधुदुर्ग यांच्या वतीने १ ते ७ ऑगस्ट या कालावधीत जागतिक स्तनपान सप्ताह उत्साहात साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील सर्व शासकीय रुग्णालये, ग्रामीण रुग्णालये, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे तसेच आरोग्य व आयुष्मान आरोग्य मंदिरांमध्ये विविध जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत.